देसाईगंज: 7 जानेवारी ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये वार्षिक क्रिडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या चार दिवसीय क्रिडा महोत्सवासाठी एस.आर.पी.एफ. राज्य पोलीस दलाचे माननीय दशरथ जांभूळकर सर आणि माननीय मारोती लांबेवार सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच शाळेच्या संस्थापक नमिता जेजानी मॅडम, मुख्याध्यापिका रेहाना शेख मॅडम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच पालकवर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी मशाल प्रज्वलित करून केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या भव्य मार्च पास्टने उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रमुख पाहुणे दशरथ जांभूळकर सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना क्रिडा खेळाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी खेळामध्ये शिस्त, एकजूट आणि कष्ट करण्याच्या मूल्यांचा अभ्यासक्रमाप्रमाणेच महत्त्व असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण क्रिकेटचा सामना होता. प्रमुख पाहुण्यांनी पहिला चेंडू टाकून आणि फलंदाजी करून सामन्याची सुरुवात केली. संपूर्ण मैदानावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय विविध क्रिडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली खेळाडू वृत्ती आणि कौशल्य यांचे सुंदर प्रदर्शन केले.
जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्स ही शाळा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रिडा आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या क्रिडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामूहिकता, स्पर्धात्मकता, आणि शारीरिक तंदुरुस्तीची भावना निर्माण झाली. चार दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण आणि कौतुकाने करण्यात आला.