गडचिरोली, (जिमाका): महिला व बाल विकास विभागाव्दारे प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाची स्थापना केली आहे. बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, व काळजी व संरक्षणची गरज असणाऱ्या बालकाविषयी कायद्याची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य या कक्षातर्फे केल्या जाते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, गडचिरोली तर्फे दिनांक 18 ऑगष्ट 2025 रोजी पंचायत समिती सभागृह, गडचिरोली येथे ग्राम बाल संरक्षण समिती मधील सदस्यांचे क्षमताबांधणी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 10 जुन 2014 नुसार ग्राम बाल संरक्षण समितीची रचना व कार्य, भूमीका, देण्यात आलेल्या आहेत. तसेच बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम 2012 सुधारित अधिनियम 2019 (पोक्सो कायदा), बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 सारख्या कायद्याची अंमलबजावणी करिता ग्राम बाल संरक्षण समितीची महत्वाची भूमीका आहे. त्याकरिता तेथील सदस्य सचिव अंगणवाडी सेविका, सदस्य पोलिस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांना क्षमताबांधणी प्रशिक्षण देवून समित्यांची भूमीका अधिक बळकट होईल.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेला उदघाटक म्हणून प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सिंधु गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथील जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, एकात्मिक बाल विकास सेवा योजान प्रकल्प गडचिरोली कार्यालयाच्या विस्तार अधिकारी आशा वरघंटे, पर्यवेक्षिका एल. झरकर, शालीना पेंदोर हे मान्यवर प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 सुधारित अधिनियम 2019 (पोक्सो कायदा), या विषयावर मास्टर ट्रेनर जयंत जथाडे, व ग्राम बाल संरक्षण समितीची भूमीका व जबाबदाऱ्या या विषयावर जिल्हा परिवर्तन समिती जिल्हा समन्वयक रवि आडे, बालविवाह प्रतिबंध व दत्तक प्रक्रिया, प्रायोजकत्व व प्रतिपालकत्व बाबत बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, महिला व बालविकास विभागाचे योजना याविषय कवेश्वर लेनगुरे यांनी मार्गदर्शन केले. शेवटचे बालविवाह प्रतिबंधक कायदे व उपाययोजना आणि बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनीयम या विषयावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामुळे ग्राम बाल संरक्षण समिती मधील पोलिस पाटील, शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच बाल हक्क व बाल संरक्षणाविषयी काम करणाऱ्या यंत्रणा अधिक अॅक्टीव होवून बळकट होणार आहे. सदर प्रशिक्षणाची सुरुवात गडचिरोली तालुक्यात दोन टप्यात घेण्यात आले. यामध्ये दिनांक 18 ऑगष्ट 2025 रोजी एकुण 123 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तर दिनांक 19 ऑगष्ट 2025 रोजी 143 प्रशिक्षणार्थी असे एकुण दोन्ही दिवस 266 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडु यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता रविद्र बंडावार, क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख, चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक देवेंद्र मेश्राम, केस वर्कर मयुरी रक्तसिंगे, नितीन मेश्राम, अल्का जरुरकर, शुभम निकोडे, रितेश ठमेक यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहुन सहकार्य लाभले. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Author: Deepak Mittal
