देसाईगंज : जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये दिनांक ११ जानेवारी रोजी बाल मेला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून (B.R.C) कार्यालयाचे गटसमन्वयक माननीय पिल्लारे सर तसेच माननीय दिलीप जेजानी सर उपस्थित होते. शाळेच्या संस्थापक नमिता जेजानी मॅडम, मुख्याध्यापिका रेहाना शेख मॅडम, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कार्यक्रमाचा प्रारंभ प्रमुख पाहुण्यांनी विविध स्टॉलवर जाऊन पदार्थांची चव घेऊन केला. या वेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी लावलेल्या स्टॉल्सवर विविध प्रकारचे खेळ, पदार्थ आणि आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते.
उत्सवात सहभागी पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पदार्थांचा आस्वाद घेतला आणि खेळांमध्ये सहभाग घेतला. संपूर्ण परिसर आनंदाने भरून गेला होता.
जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्स ही शाळा शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच आग्रही राहिली आहे. या बाल मेला उत्सवाने विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या सहभागाचा आनंद लुटण्याची संधी दिली.
