गडचिरोली: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व खेळाडूंमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी स्व. मे. ध्यानचंद, हॉकीचे जादूगार यांचे जन्मदिनानिमीत्य राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणात क्रीडामय वातावरणात करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 29 ऑगष्ट, 2025 रोजी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे व याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी दि. 28/08/2025 पर्यंत आपला प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदवावा व अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. खालील तपशीलाप्रमाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. 29/08/2025 रोजी सकाळी 09.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथुन रॅलीचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. दि. 29 ते 31 ऑगष्ट 2025 दरम्यान विविध उपक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात येतील.
अ.क्र.
दिनांक
उपक्रम
1
29/08/2025
विविध संस्थांमध्ये सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली, फिट इंडिया प्रतिज्ञा अणि 60 मिनिटांचे सांघिक क्रीडा स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळ
2
30/08/2025
शाळा / महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा विषयावर वादविवाद, तंदुरुस्ती चर्चा, स्वदेशी खेळ क्रीडा स्पर्धा, इनडोअर खेळ.
3
31/08/2025
रविवारी सायकलवर नागरीकांचा संपुर्ण भारतात सहभाग
राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्याने दि. 29/08/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता पासून जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्प्लेक्स येथे खुल्या गटामध्ये रस्सा खेच, 50 मीटर रिले, मॅरेथान, चमचा गोळी, पोता दौड, योगा, खो-खो, कबड्डी व व्हॉलीबॉल इत्यादी व वरिष्ठ गटामध्ये 300 मीटर जलद चालणे, 1 कि.मी. चालणे, योगा इत्यादी खेळप्रकार घेण्यात येतील. सदर स्पर्धेदरम्यान विजेता संघ / खेळाडूस मोमेन्टो / मेडल देण्यात येतील. सदर स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी / क्रीडाप्रेमींनी आपला सहभाग नोंदवावा. प्राविण्य प्राप्त खेळाडू / संघांना प्रोत्साहनात्मक बक्षीसे देऊन गौरविण्यात येईल. तसेच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://fitindia.gov.in/national-sports-day-2025 या लिंकवर नोंदणी (Registration) करावी. गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व महाविद्यालयामध्ये टिप्पणीत नमुद केल्याप्रमाणे दि. 29/08/2025 ते दि. 31/08/2025 या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधुन विविध क्रीडा विषयक उपक्रमाचे आयोजन करावे व तसा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केलेले आहे.

Author: Deepak Mittal
