देसाईगंज: दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उत्साहवर्धक कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य रेहाना शेख, शाळेचे संस्थापक पुनित जेजानी सर, नमिता जेजानी मॅडम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग व पालकांनी गरब्याचा उत्साहाने आनंद घेतला आणि आपल्या उत्साही सहभागाने कार्यक्रमाला रंगत आणली.

सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तो अत्यंत आनंदमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी दिवठे यांनी केले, तर सीमा राऊत यांनी नवरात्रीच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप विलास करांडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

Author: Deepak Mittal
